स्वच्छ चितळी अभियान

आपले मन स्वच्छ, तर आपले घर स्वच्छ।
आपले घर स्वच्छ, तर आपला परिसर स्वच्छ
तर आपली चितळी स्वच्छ ।।

पहिले पाऊल घरचा धंदा।दुसरे पाऊल दारच्या प्रबंधा।।

पुढे ग्राम सफाईच्या छंदा।लावोनि घ्यावे आनंदे।।

गावातीलरस्ते, गल्ल्या, घरासमोरीलअंगणे, परसबागा, स्वच्छता, सजावट व वृक्ष संवर्धन

आपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्व कोणीही नाकारू शकत नाही. स्वच्छ परिसर, हवा, पाणी, वातावरण कोणाला नकोसे असते. स्वच्छतेने रोगराई नाहीशी होते, आजार पसरत नाहीत, आणि आपली जीवन शैलीही बदलून जाते

Smart चितळी

चितळी हे गाव खटाव तालुक्यात येते . गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने राहातात . संपुर्ण राज्यामध्ये प्रसिध्द असणारे येरळा नदीवरिल टेंभू पाटाचा पुल हे चितळीचे वैशिष्ट्य आहे . गावाच्या जवळुनच जरी येरळा नदी वाहत असली तरी या भागावर कायमच दुष्काऴाचे सावट असते . तरी सुद्धा गावातील लोक गट – तट , राजकारण बाजुला ठेवुन गावाच्या विकासासाठी कटीबध्द आहेत . सरपंच , उपसरपंच , ग्रामविकास, तलाठी, अधिकारी व गावातील जाणकार , विकसनशील नागरीक यांच्या प्रयत्नांतुन चितळी गाव वाटचाल करत आहे .