1.पर्यटक स्थान :

केनाँल:-

  • चितळी गावामध्ये टेंभु उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत सुमारे 3 कि. मी अंतर लांबीचा टेंभु केनाँल बांधण्यात आला आहे.

1.पर्यटक स्थान :

 नदी:-

  • चितळी गावामध्ये येरळा नदी आहे
  • येरळानदी ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे.
  • येरळा ही नदी वेदावती या नावाने ही परिचित आहे. या नदिवर ब्रिटिश कालीन नेर आणि येरळवडी ही दोन लहान धरणे आहेत.येरळा नदी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कायम स्वरुपी दुष्काळी तालुके खटाव,खानापूर,तासगाव तालुक्यातील लोकांची जीवनदायिनी आहे.12 महिण्यापैकी येरळानदी 6 माही वाहिनी असून इतर 6 महिने नदीचे पात्र कोरडे असते.मागील 40 वर्षा पासून या खोऱ्यातील अत्यल्प पावसामुळे या नदीच्या खोऱ्यातील लोक भीषण दुष्काळाचा सामना करत आहेत.येरळा नदीचे खोरे आणि माण नदीचे खोरे पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी मराठवाडा समजले जाते. माण आणि येरळा या नद्यास नदी जोड प्रकल्प अती आवश्यक आहेत.

1.पर्यटक स्थान :

विठ्ठल मंदीर

  • विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठीसंपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणतात. [२].हे विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचादेव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे.पंढरपूर च्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा मठ आहे तिथे गुंफेत सर्व साधु संतांच्या मुर्त्या आहे